रत्नागिरीतील कार्यक्रमाने सावरकर परिक्रमा पूर्ण ः विनता जोशी

रत्नागिरी ः शाहिरीच्या माध्यमातून स्वा. सावरकरांचे कार्य सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य हाती घेतले आहे. सावरकरांचे जन्मगाव भूगूर येथून या कार्याला सुरूवात केली. त्यांचे वास्तव्य व कार्याच्या ठळक खुणा असलेल्या मुंबई, अंदमान, लंडन या ठिकाणी कार्यक्रम केले. परंतु रत्नागिरीतील पतितपावन मंदिर या सावरकर यांनी उभारलेल्या पावन वास्तूत माझा कार्यक्रम होण्याचे राहून गेले होते. आज या ठिकाणी कार्यक्रम करून सावरकर परिक्रमा पूर्ण झाली असल्याचे स्वा. सावरकरांची नात विनता जोशी यांनी सांगितले.
स्वा. सावरकर जयंती निमित्त पतितपावन मंदिरात नमन वीरतेला हा कार्यक्रम सादर झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबा परूळेकर यांनी विनता जोशी यांचे संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देवून गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button