गुणपडताळणीसाठी 10 मे पर्यंत puppsshelpdesk@gmail.com वर अर्ज करा

रत्नागिरी, दि. 3 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचा निकाल 30 एप्रिल रोजी संकेतस्थळावर घोषित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये 10 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आपला अर्ज puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर 10 मे रोजीपर्यंत पाठविण्यात यावे, असे उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी कळविले आहे.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी). शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा,आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 10 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. 10 मे रोजीपर्यंत पाठविण्यात यावे. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेल गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button