
शिवसेना उबाठाचे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे २८ रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठाचे विनायक राऊत तिसर्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत येणार असून त्यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा होणार आहे.शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाशेजारी संध्याकाळी ६ वाजता होणार्या या सभेत ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राऊत हे निवडणूक रिंगणात मोठ्या तयारीने उतरलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उबाठाचे युवानेने आदित्य ठाकरे यांची ४ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. तसेच राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही जाहीर सभा होणार आहेत.www.konkantoday.com