
प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते भाजप नेते बाळासाहेब माने व तालुका अध्यक्ष दादा दळी यांचा सत्कार
_प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा यांच्या हस्ते भाजप नेते बाळासाहेब माने व तालुका अध्यक्ष दादा दळी यांचा सत्कार करण्यात आला.* रत्नागिरी मध्ये प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तन संध्या ,पर्व दुसरे हा कार्यक्रम सुरु आहे. ” आले राम राज्य, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ” असा आशय या कीर्तनाचा असून ह.भ.प.आफळे बुवा यांच्या सुश्राव्य वाणीतून हे मांडत आहेत. अनेक रत्नागिरी वासिय या कीर्तनाचा लाभ घेत असून रत्नागिरी करांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या कीर्तन संध्या या कार्यक्रमाला भाजप नेते लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, तालुका अध्यक्ष दादा दळी उपस्थित होते, राम मंदिराच्या चळवळी मध्ये अनेक कारसेवकांनी सहभाग घेतला त्या मध्ये माजी आमदार बाळासाहेब माने देखील होते म्हणून आयोजकांनी बाळासाहेब माने व दादा दळी यांचा ह.भ.प.आफळे बुवा यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.www.konkantoday.com