सावर्डे-रत्नागिरी दरम्यान १२ रोजी मेगाब्लॉक


कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे-रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १२ जानेवारी रोजी २ तास ३० मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी ७ ते ९.३० या वेळेत घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस १२ जानेवारी रोजी मडगांव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. २०९२३ क्रमांकाची तिनेलवेली-गांधीधाम एक्स ११ जानेवारी रोजी मडगांव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे रोखण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button