रत्नागिरी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ


रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून श्रीगणेशा होणार होतं आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील १०० प्रवेशाची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था शासकीय अध्यापक महाविद्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष विनाविलंब आजपासून सुरू होणार असल्याचेही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालयाचे काम आता वेगाने अंतिम टप्प्याकडे आले आहे. ऑक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात या महाविद्यालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भव्य उदघाटनाच्या सोहळ्याची तारीख ठरली नसली तरी आजपासून पहिल्या वर्षाच्या शैक्षणिक कामाला सुरूवात केली जाणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पितृपक्षानंतर महाविद्यालयाच्या उदघाटनाचा भव्य सोहळा पार पडणार असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button