लांजात श्री रामराज्य रथयात्रेचे वाजतगाजत स्वागत

लांजा : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशातील २७ राज्यांतून काढण्यात येत असलेली श्री रामराज्य रथयात्रा शुक्रवारी लांजा येथे दाखल झाली. श्री बसवेश्वर चौक येथे येथे सकाळी ११ वाजता आलेल्या या रथयात्रेचे लांजावासियांनी स्वागत केले. दसऱ्याच्या मुहुर्तावर शुभारंभ झालेली श्री रामराज्य रथयात्रा सध्या कोकणात दाखल झाली आहे.
शुक्रवारी सकाळी रथयात्रा लांजात दाखल झाली असता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्यावतीने या रामराज्य रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने जोरदार तयारी करण्यात आली होती. लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर बसवेश्वर चौकात रथयात्रेचे आगमन झाले. त्यानंतर शहरातील योगी हॉटेल समोरील मैदानावर या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गुरुप्रसाद देसाई, अविनाश जाधव, मोहन तोडकरी, राहुल शिंदे, शिवाप्पा उकळी, प्रल्हाद साळूंखे, स्वरूप गुरव, प्रसाद भाईशेट्ये, मिलिंद लांजेकर, मिलिंद वाघधरे, सुमित गुरव, सुशील कुलकर्णी, आप्पा भाई शेट्ये, प्रथमेश काटगाळकर, रूपेश चव्हाण, राजू मोरे, सचिन कदम, प्रियवंदा जेधे, सौरभ कवचे, सिद्धेश तोडकरी, यश पवार, श्रेयस शेट्ये, चिरायु देसाई, अनिकेत शेट्ये, ओमकार जेधे, निलेश जंगम, बाबु पवार आदींसह विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button