
देवरूखमध्ये विवाहितेचा आकस्मिक मृत्यू
देवरूख : येथे राहणार्या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 10.20 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दीप्ती अभिजित पवार (वय 28) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची खबर दिप्ती हिचा पती अभिजित दिलीप पवार (वय 31 रा. मच्छीमार्केट, देवरूख) याने दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी दीप्ती ही नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी गेली होती. घरी येताना ती रस्त्याच्या बाजूला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला देवरूख ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. अधिक तपास हे. काँ. संतोष सडकर करीत आहेत.