
खेडमध्ये हापूस आंब्यांची चोरी
खेड : येथील एका बागायतदाराच्या मालकीच्या जागेतील ३० हजार रूपये किमतीचे हापूस आंबे व ४ हजार रुपयांच्या केशर जातीच्या आंब्याची अज्ञात इसमाने चोरी केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडमध्ये राहणाऱ्या छाया अशोक पवार (वय ५७) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दि. ७मे रोजी सायंकाळी ४.३० ते दि ८ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या मुदतीत त्यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्याने फळे चोरली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.