
मारुती आळी येथे हनुमान जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम
रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा . हनुमान याग , सायं . ५.३० . भ . प मकरंदबुवा रामदासी ( सज्जनगड ) यांचे कीर्तन , दि . १५ एप्रिल रोजी श्रींच वाढदिवस सकाळी पूजा अर्था , लघुरुद्र अभिषेक , सायं . ५.३० वा . मकरंदबुवा रामदासी ( सज्जनगड ) यांचे कीर्तन , रात्री ९ वा . भोवत्या . शनिवार १६ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा पहाटे ५ वा . मकरंदबुवा रामदासी ( सज्जनगड ) यांचे श्रींच्या जन्मोत्सवाचे कीर्तन , सकाळी ६. ३ ९ वा . श्रींचा जन्मकाळ , स . ८ ते सायं ४ वाजेपर्यंत विविध भजने , सायं . ५ वा श्रीधी भव्यदिव्य रथोत्सब मिरवणूक साय ६ वा . भजन श्री भैरव प्रासादिक भजन मंडळ ( के . शंकरराव मरोकर ) मुरुगवाडा , रत्नागिरी , बुवा- अजय पिलणकर , रात्री ८ वा . मंत्रजागर , रात्री १० वा . मिरवणुकीचे मंदिरात आगमन भोवत्या व आरती.
रविवार १७ एप्रिल रोजी सायं . ६ ते ८ वा भजन , श्री व्याडेश्वर भजन मंडळ , रत्नागिरी ( बुवा राकेाश येई ) , रात्री १० वा . ह . भ . प . मकरंदबुवा रामदासी ( सज्जनगड ) यांचे लळीताचे कीर्तन सोमवार १८ एप्रिल रोजी सकाळी उत्सव सांगता , लघुरुद्र , १२ ते ३ पर्यंत महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत .
या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर भिंगार्ड , प्रमोद शेरे , योगेश मलुष्टे , गणेश भिगार्ड यांनी केले आहे.