
राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले
आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्तयांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.तसेच, मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये, असं आवाहन देखी राज ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं समोर आलं आहे.
ही बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “निवडणुकीचं, निवडणुकीच्या दिवशीचं व्यवस्थापन कसं करायचं? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकाशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आता सध्या तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत.”
www.konkantoday.com




