पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाची पारदर्शक छत असलेली बस सेवेत दाखल

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने पारदर्शक छत असलेली बस सेवेत दाखल केली आहे. एसटीच्या पुण्यातील दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी केलेली ही बस पर्यटनासाठी वापरण्यात येणार आहे.सातारा विभागाला अशा प्रकारची पहिली बस ताब्यात देण्यात आली.
प्रवाशांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यादृष्टीने बसची बांधणी केल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या बसचे छत पारदर्शक आहे. चालकांकडून प्रवाशांना, पर्यटकांना स्थळांची माहिती मिळावी यासाठी अशी यंत्रणाही या बसमध्ये उपलब्ध केली आहे. प्रवाशांना मोबाइल चार्जिग पॉईंट, अतिरिक्त सामानासाठी दोन बूथ, बसच्या मागे बाहेरील बाजूस एलईडी मार्ग फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसमध्ये प्रवेशासाठी पुढच्या बाजूनेच व्यवस्था करण्यात आली आहे. ही बस महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शनासाठी महाबळेश्वर आगारात उपलब्ध असणार आहे. दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर दर्शनासाठी उपलब्ध असलेल्या या बसचे प्रवासी भाडे प्रत्येकी १०५ रुपये असेल. प्रतापगडसाठी ही बस सकाळी साडेनऊ वाजता सोडण्यात येणार असून त्यासाठी ११५ रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button