
डेक्कन क्वीन एक्प्रेसलाही १५ ऑगस्टपासून विस्टाडोम कोच जोडला जाणार vista dome coach
मध्य रेल्वेने अलीकडेच मुंबई ते पुणे धावणाऱ्या डेक्कन एक्प्रेसला पारदर्शक विस्टाडोम कोच बसविला होता. यास मिळालेल्या प्रतिसादामुळे आता याच मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्प्रेसलाही १५ ऑगस्टपासून विस्टाडोम कोच जोडला जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या दादर-मडगाव जनशताब्दी एक्प्रेसला यंदा एलएचबी डब्यांसह पारदर्शक छताचा ‘विस्टाडोम’ कोच लावण्यात आला.
Vistadome coach to be attached to deccan queen express
तसेच प्रथमच मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन एक्प्रेसला २६ जूनपासून विस्टाडोम कोच लावण्यात आला आहे. त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आता याच मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्प्रेसलाही पारदर्शक ‘विस्टाडोम’ कोच स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर लावण्यात येणार आहे.
www.konkantoday.com