रत्नागिरी येथील सरकारी रुग्णालये कोरोना प्रसाराची केंद्र ठरण्याचा धोका?

रत्नागिरी जिह्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नऊ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे करोना चा प्रसार रोखावा यासाठी करोना टेस्ट बाहेरून येणार्‍यासाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत मात्र असे असले तरी गेले कित्येक महिने रत्नागिरी शासकीय रुग्णालययेथील काेराेना रुग्णालय व महिला रूग्णालय येथील कोरोना रुग्णालय येथूनच कराेनाच्या प्रसाराला वाव मिळेल असे प्रकार सुरू असतानादेखील जिल्हा यंत्रणा त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत या दोन्ही रुग्णालयांत अनेक कोरोना रुग्ण दाखल आहेत कोरोना हा संसर्गजन्य असल्याने शासनाने मास्क व सुरक्षित अंतर, हातांची स्वच्छता आदी कडक नियम घातले आहेत असे असताना या दोन्ही रुग्णालयांत कोरोना रुग्णांचे नातेवाईकाना सुरक्षिततेची कोणतीही साधने न देता थेट रुग्णांपर्यंत भेटण्यास दिले जात आहे रुग्णालयात मिळणाऱया जेवणाचा दर्जा पाहून अनेक रुग्णाला त्यांचे नातेवाईक घरातून डबा घेऊन येत आहेत व थेट रुग्णांपर्यंत नेत आहेत रुग्णांना भेटून हेच नातेवाईक थेट आपल्या घरी व गावात परतत आहेत कोरोना सुरू झाल्यापासून हा प्रकार सर्रास सुरू आहे अनेकवेळा तर रुग्ण करोना रुग्णांचे कपडे सुद्धा धुण्यासाठी घरी नेत आहेत हा मुद्दा अनेक वेळेला पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रशासनासमोर व लोकप्रतिनिधींसमोर मांडला होता त्यावेळी भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांची करोना टेस्ट करावी असे सांगण्यात आले होते परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही असे प्रकार होत असतील तर याबाबत चौकशी करू असे आश्वासन देण्यात आली मात्र अद्यापही हे सर्व सुरू आहे मुळातशासकीय रुग्णालयात कर्मचारीवर्ग अपुरा आहे रुग्णांच्या मोठय़ा संख्येमुळे त्यांच्यावर सतत ताण येत आहे त्यामुळे नातेवाईकांना रुग्णांना भेटू न दिल्यास कर्मचार् यांवर आणखी कामाचा बोजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या बाबत मवाळ धोरण घेतले जात आहे रुग्णांना घरचा डबा मिळावा यात काहीही वावगे नाही मात्र रुग्ण व नातेवाइकांची थेट भेट होणं हे धोकादायक आहे अनेकवेळा रुग्णांना औषधे किंवा अन्य कामासाठी नातेवाईकांची गरज असते हे जरी खरे असले तरी नातेवाईकांना रुग्णांना भेटण्यास देताना रुग्णालयाच्या यंत्रणेने नातेवाईकांना किमान पीपी कीट किंवा अन्य सुरक्षित साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यामुळे संसर्गाचा धोका टळू शकेल परंतु तसे होत नाही या पध्दतीने सुरू राहिले तर संसर्गाचा प्रसार मोठा होऊ शकतो हे माहीत असतानादेखील संबंधित यंत्रणेकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलली जात नाहीत त्यामुळे जनतेवर निर्बंध लादतानाच अशा रूग्णालयातून एक प्रकारे कोरोना प्रसाराचा धोका असताना हे प्रकार थांबवणे किंवा त्याबाबत किमान सुरक्षितता घेणे गरजेचे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असा प्रकार सुरू होता मात्र दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने त्यावर बंदी घातली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button