पुन्हा एकदा प्राचीन कुणकेश्वर मंदिराचे अवशेष सापडले

कुणकेश्वर मंदिराकडून समुद्रकिनारी उतरण्यासाठी पायर्‍या तयार करीत असताना सुरू केलेल्या खोदकामामध्ये पुन्हा एकदा प्राचीन कुणकेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. काळ्या बेसाल्ट दगडाच्या सुरेख कोरीव वास्तू अवशेष आहेत. यामध्ये मंदिराच्या मुख्य मंडपाच्या शिखरावर चालुक्य, शिलाहाराच्या काळात करोटक प्रकारातील बांधकाम केले जात असे. तशा प्रकारच्या बांधकामातील वास्तू घटक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे, अशी माहिती इतिहास संशोधन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व इतिहास अभ्यास रणजीत हिर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button