गणपतीपुळे येथील वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची भा.ज.पा. जिल्हाध्यक्षांची पर्यटनमंत्री मा. ना. आदित्यजी ठाकरे यांचेकडे मागणी

कोव्हीड लॉकडाऊन नंतर सर्व व्यवसाय पूर्वपदावर आले आहेत. मात्र गणपतीपुळे येथील वॉटर स्पोर्ट्स या लोकप्रिय व्यवसायाला शासन मंजुरी नसल्याने या व्यवसायात असलेले व्यावसायिक व त्या व्यवसायात नोकरी करणारे तरुण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार मागणी करूनही वॉटर स्पोर्ट्स सुरू होत नसल्याने डिसेंबरचा पर्यटनाचा सिझन सुद्धा गमवावा लागणार अशी भीती या व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली. या संदर्भात ” मोरया वॉटर स्पोर्ट्स अॅण्ड बीच असोसिएशन” गणपतीपुळेचे अध्यक्ष श्री. उदय सू पाटील व अन्य सहकाऱ्यांनी अँडव्होकेट. दीपक पटवर्धन यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यानंतर अँडव्होकेट. पटवर्धन यांनी मा.आ.प्रसादजी लाड, मा.आ.निरंजनजी डावखरे, मा.आ. शेखरजी निकम यांना संपर्क केला व हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली. तसेच पर्यटन मंत्री ,मा. ना. आदित्यजी ठाकरे यांना पत्र पाठवत वॉटर स्पोर्ट्स तात्काळ सुरू करून या व्यावसायिकांना सहाय्य करावे अशी मागणी पत्राचे माध्यमातून केली आहे. डिसेंबर अखेरीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता वॉटर स्पोर्ट्स या व्यवसायाला असलेली मोठी संधी व्यवसायिकांपासून हिरावली जाऊ नये अशी अपेक्षा भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अँडव्होकेट. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button