
विनापरवाना गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर तालुक्यातील अनुस्करा चेक पोस्टवर विनापरवाना गुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांनी पकडून त्यातील गुरे व टेम्पो असा दोन लाख चोवीस हजार रुपयाचा माल जप्त केला याप्रकरणी पोलिसांनी जयदीप वाघरे राहणार गगनबावडा व तरबेज ठाकूर राहणार परतवली राजापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील दोन आरोपींनी आपल्या बोलेरो पिकप व्हॅनमधून विनापरवाना अवैद्य पद्धतीने गुरांना टेम्पोतून राजापुर ते मुरगुड कोल्हापूर असे नेत असताना राजापूर तालुक्यातील अनुस्करा चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले पोलिसांनी टेम्पो सह ७गुरे ताब्यात घेतली आहेत तसेच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com