तारापुरच्या नंदोलिया प्लांट मध्ये मोठा स्फोट, वातावरणात दुर्गंधी पसरली आहे

बोईसर,दि.१७: बोईसर औद्योगिक नगरी पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरली असून येथील नंडोलिया नामक रासायनिक कारखान्यात हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक वसाहतील टी-१४१ या प्लॉटवर नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नामक रासायनिक उत्पादन घेणारी कंपनी आहे. या कंपनीत आज संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तर सुमारे १० ते १२ किलोमिटर पर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला.या कंपनीपासून काही अंतरावर सालवड व शिवाजीनगर ही गावे असून स्फोटामुळे येथे मोठा हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.संध्याकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास पाळी बदली झाल्यानंतर दुसऱ्या पाळीकडे कार्यभार सोपवताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून स्फोटात जखमी किवा मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र सोबतची तीव्रता पाहता यात अनेक कामगार जखमी झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या स्फोटामुळे वायू गळती होत असल्याची माहिती पुढे आली असून कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याचे सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button