
रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर
झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ जून) दरवर्षी रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी हा पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर करण्यात आला आहे; मात्र या वर्षी करोना संकटकाळामुळे पुरस्कार वितरण समारंभ प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
स्वराली तांबे चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये सहावीमध्ये शिकते. पाग व्यायामशाळेत दुसरीपासून प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ती योगासनांचा सराव करत आहे. तिने आतापर्यंत मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा, जिल्हा फेडरेशन आयोजित स्पर्धा, तसेच अमरावती, गाझियाबाद येथील योग स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत.दादरच्या शारदाश्रम येथे महापौर चषक, शिर्डी, पतियाळा (पंजाब), कणेरी मठ येथे शालेय योगासन स्पर्धा, संगमनेर येथे ऱ्हिदमिक योग स्पर्धेत तिने यश मिळवले आहे. चिपळूण नगरपालिका, ब्राह्मण सहायक संघ, दापोली हितवर्धिनी पतसंस्था, ज्येष्ठ नागरिक संघ आदींनीही तिचा यापूर्वी सन्मान केला आहे.
www.konkantoday.com