
कांदळवन नष्ट केल्याच्या आरोपावरून दापोली-अडखळ येथे ११ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील अडखळ येथे कांदळवन बेकायदेशीररित्या नष्ट केले, या आरोपावरून संजय सावंत, इसाक काझी, रिझवान काझी, समीर काझी, निसार काझी, अकबर काझी, सिद्दीक शिरगांवकर, इम्तियाज काझी, वर्षा शिर्के आदी जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दापोली कॅम्पचे तलाठी आदित्य हिरेमठ यांनी दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीनी पर्यावरण संरक्षण अधिनियमाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
www.konkantoday.com