
परशुराम औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी चिपळूण आगारातून बस फेर्याना सुरवात
परशुराम औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी चिपळूण आगारातून दि. २७ मेपासून सकाळी ७ व दुपारी २ या वेळेत बस फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण आगारातून गेली दोन महिने बससेवा बंद होती़ लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे़ येथील कारखान्यांमध्ये चिपळूण शहरासह महामार्गावरील गावातील बहुसंख्य कामगार काम करतात. काही कारखान्यांनी कामगारांसाठी बसची व्यवस्था केली आहे़ मात्र छोट्या कारखान्यांतील कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता़ उद्योजक संघटनेने चिपळूण आगाराकडे या कामगारांसाठी बस सोडण्याची विनंती केली होती़
संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी बससेवा सुरु करण्यासाठी चिपळूण आगाराकडे पाठपुरावा केला होता़
www.konkantoday.com
