विजेचा धक्का बसल्याने प्लंबरचा मृत्यू

चिपळूण सती येथील एका शिक्षकाच्या घरी प्लंबिंगचे काम करीत असताना मुख्य वीजवाहिनीच्या तीव्र धक्क्याने महेश परशुराम दाते या प्लंबरचा मृत्यू झाला. सती येथील एका शिक्षकाच्या घरी दाते हे प्लम्बिंगच्या कामासाठी गेले होते घराच्या बाहेरील काम करीत असताना उंचावरील काम करण्यासाठी त्यांनी लोखंडी शिडीचा वापर केला मात्र त्या शिडीचा स्पर्श बाहेरून जाणाऱ्या विजेच्या मुख्य वाहिनीला झाला त्यामुळे शिडी हातात धरलेल्या दाते यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button