
चिपळूण नगर परिषदेतील सफाई कामगारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कोरोनाच्या या लढाईत चिपळूण नगर परिषदेतील सफाई कामगार शहरामध्ये फवारणी, साफसफाई, नियमित कचरा गोळा करणे आदी कामे नियमित करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नगर परिषदेच्या कामगारांचे मोठे योगदान राहिले आहे, ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा सौ.सुरेखा खेराडे यांनी अपरांत हॉस्पिटलचे डॉ. यतीन जाधव यांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या सफाई कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन शुक्रवारी अपरांत हॉस्पिटलमध्ये केले
www.konkantoday.com