निर्यातीत हापूसचा टक्का घसरला


निर्यातीत हापूसचा घसरणारा टक्का वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्वाचे ठरू शकते. जीआय नोंदणीपासून ते विक्रीसाठी पणन मंडळाने अनुदान देण्याची तयारी केली आहे. निर्यातीसाठी ५० टक्के अनुदान देणार असल्याची माहिती पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
श्री. पवार म्हणाले देशातील निर्यातीपैकी केसरची निर्यात ६० ते ७० टक्के आहे. हापूसची निर्यात घसरत आहे. पाकिस्तानचा आंबा स्वस्त विकला जातो. निर्यात खर्चावर तेथील व्यापार्‍यांना अनुदान मिळते. एका आंब्याच्या निर्यातीचा खर्च दोनशे रुपये आहे. ७५ टक्के सबसिडी मिळाली तर तो खर्च पन्नास रुपयांपर्यंत येतो. खर्च कमी करण्यासाठी गतवर्षी जहाजमार्गे आंबा पाठविण्यात आला. त्याचा खर्च एका नगाला २५ ते २६ रुपये इतका आला. निर्यात वाढीसाठी नवनवीन प्रयोग पणनमार्फत सुरू आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button