
गोविंदगडावरील मशाल महोत्सवाला प्रथमच नगराध्यक्षांची उपस्थिती; उमेश सकपाळ ठरले पहिले नगराध्यक्ष!
शेकडो मशालींच्या प्रकाशात ऐतिहासिक गोविंदगड उजळला; हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य सोहळा


चिपळूण : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या0 चिपळूण येथील ऐतिहासिक गोविंदगड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो मशालींच्या प्रकाशात संपूर्ण गोविंदगड उजळून निघाला. फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या महोत्सवाला हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, आजवरच्या मशाल महोत्सवाला उपस्थित राहणारे उमेश सकपाळ हे चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष ठरले.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या उपस्थितीचे शिवप्रेमींनी विशेष कौतुक केले. शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देणारा आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची प्रेरणा देणारा हा मशाल महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, श्रीदेवी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर, नगरपालिकेतील बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, सौ. आरती सकपाळ, फैसल मेमन, दयानंद जुवळे, नगरसेविका मिसबाह नाखुदा यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.




