कोकणचे पाणी कोकणलाच द्या

ॲड विलास पाटणे

आज पुन्हा एकदा वीजनिर्मितीनंतर कोयनेचे वाहून जाऊन समुद्रात मिळणारे 67 टी एम सी पाणी मुंबईकडे वळवणार अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत केली . हे वाहून जाणारे पाणी 290 कि.मी. अंतरावरील मुंबईत जल वाहिन्यामधून आणण्याचा प्रस्ताव नव्याने आला आहे. त्यासाठीचे हवाई सर्वेक्षण व्हॅसकॉम कंपनीने नुकतेच पूर्ण केले. या हवाई सर्वेक्षणासाठी 38 कोटी इतका खर्च झाला आहे. पाटबंधारे विभागाचे माजी सचिव म. दी. पेंडसे समितीने कोयनेच्या पाण्याचा वापर आधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना पिण्यासाठी व शेतमळ्यांना शेतीसाठी करावा असे म्हटले होते.
तसेच १५० इंच पाऊस पडणाऱ्या कोकणात महापुरामुळे प्रचंड जिवीतहानी नुकसान होते; तर उन्हाळ्यात बायाबापड्यांना पिण्याच्या पाण्याकरीता डोक्यावर हंडा घेऊन मैलोन मैल पायपीट करावी लागते हे दुष्टचक्र आहे.
मुंबईतील पाण्याचा प्रश्न कितीही गंभीर असला तरी पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क ‘रिपरिअन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे आणि कोकणचे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button