भाजपा खेड उत्तर मंडळाच्या तालुका सचिवपदी अजय तोडकरी यांची नियुक्ती!

भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; संघटन बळकटीची महत्त्वपूर्ण जबाबदारी

खेड : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देण्याच्या दृष्टीने भाजपा खेड उत्तर मंडळाच्या तालुका सचिवपदी अजय आत्माराम तोडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीबद्दल अजय तोडकरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षाने सोपविलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडताना संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करावे, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावीत आणि पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षा ॲड. वैभव खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या नियुक्तीपत्र वितरणप्रसंगी भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक व गटनेते रहीम सहिबोले, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, भाजपा खेड शहर शक्तिकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा ओबीसी मोर्चा खेड शहराध्यक्ष प्रथमेश सुर्वे, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, प्रशांत बारटक्के यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अजय तोडकरी यांच्या नियुक्तीमुळे खेड उत्तर मंडळातील पक्ष संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button