
कुवारबावच्या विकासाला नवी गती, रस्ते आणि पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय
रत्नागिरीतील कुंवारबाव येथे सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या बांधकामाचं आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या निमित्तानं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष श्री. बंड्याशेठ साळवी, पंचायत समिती सभापती श्री. प्रवीण पांचाळ, उपसभापती श्री. गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश रसाळ, श्री. प्रकाश शिंदे, सौ. अपर्णाताई कोकळकर, श्री. प्रल्हाद जाडगावकर यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील आणखी दोन रस्त्यांसाठी येत्या दोन दिवसांत निधी मंजूर करण्याचा शब्द दिला. तसेच ग्रामस्थांनी सुमारे ६० वर्षांपूर्वीच्या नळपाणी योजनेतील पंपाच्या समस्येकडे लक्ष वेधलं. या कामासाठी आवश्यक निधी २४ तासांत मंजूर करण्याचा शब्द देत पाणीप्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासंदर्भात त्यांना आश्वस्त केलं. अशा विकासकामांच्या निमित्तानं ग्रामस्थांच्या भेटीगाठी होतात, त्यांचे प्रश्न समजतात आणि त्यांच्या प्रेमातून व आशीर्वादातून काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत म्हणाले.




