नाशिकमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून अडीच तोळे सोन्याच्या अंगठ्यांचा ट्रे लंपास

नाशिक – नाशिकमधील जात्रा हॉटेल परिसराजवळील आर्य ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन चोरांनी दुकानात प्रवेश करून सोन्याच्या अंगठ्यांनी भरलेला ट्रे चोरला. आरोपींनी दुकानदाराचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी संधी साधून अडीच तोळे सोन्याच्या अंगठ्या असलेला ट्रे घेऊन पसार झाले. दुकानाबाहेर तयार ठेवलेल्या चारचाकी वाहनातून ते पळून गेले. दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी चोरांचा पाठलाग केला, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button