
३१ वर्षांची प्रतीक्षा संपली! आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांतून गावडी घाटातून वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा
भांबेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला उत्साहात प्रारंभ!
भांबेड : भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाचा गजर करीत भांबेड येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या दिंडी सोहळ्याला आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, गेल्या तब्बल ३१ वर्षांपासून वारकऱ्यांकडून करण्यात येत असलेली गावडी घाटातून रस्त्याची मागणी आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांतून पूर्ण झाल्याने वारकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
भांबेड येथून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीने प्रस्थान करतात. मात्र, गेल्या ३१ वर्षांपासून या मार्गावरून वारकऱ्यांना पायी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गावडी घाटातून वारकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध व्हावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अनेक वर्षे ही मागणी प्रलंबित राहिली होती. त्यामुळे दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.अखेर वारकऱ्यांची ही जुनी आणि रास्त मागणी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने ३१ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गावडी घाटातून वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पंढरपूरच्या वारीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दिंडी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
👉🏻३१ वर्षांच्या मागणीला न्याय मिळाल्याचा वारकऱ्यांचा आनंद!
पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या आमदार किरण सामंत यांचे वारकऱ्यांनी मनापासून आभार मानले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. केवळ आश्वासन न देता वारकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रत्यक्ष रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार सामंत यांचे कौतुक केले.
👉🏻वारकऱ्यांच्या श्रद्धेला विकासकामांची जोड!
वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सुविधा मिळणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. गावडी घाटातून रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वारकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे.
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमुळे दिंडी सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणात भांबेड येथील वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.३१ वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने यंदाची वारी भांबेडच्या वारकऱ्यांसाठी केवळ धार्मिक सोहळा न राहता विकासाच्या दृष्टीनेही ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या आभाराच्या शब्दांतून आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले.
३१ वर्षांची प्रतीक्षा संपली, गावडी घाटाचा मार्ग खुला झाला आणि भांबेडच्या वारकऱ्यांची पंढरीची वारी अधिक सुखकर झाली!




