
जि.प.कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेत दिपावली संपन्न


रत्नागिरी तालुक्यातील जि.प.घारपुरी सनगरेवाडी शाळेत दिपावली सणाचे औचित्य साधत इ.१ली ते इ.४थीच्या विद्यार्थ्यांनी आकाशकंदील,उटणे,शुभेच्छाकार्ड बनविणे,पणत्या रंगविणे,रांगोळी काढणे आदी उपक्रमांनी संपन्न झाली.


विद्यार्थ्यांच्या कारककौशल्यांचा विकास करुन सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आणि एका असीम आनंदाची पर्वणी म्हणून दिपावलीचा हा उपक्रम घेण्यात आला.यात बांबूच्या काठ्या,विविधरंगी घोटीव कागद,कार्ड पेपर,खळ आदींच्या सहाय्याने छोट्या मोठ्या आकाराचे आकाशकंदिल बनविण्यात आले.लहान मोठ्या दगडातून किल्ला साकारला त्यात विहीर, घरे ,माची,बालेकिल्ला, मसलतखाना,पाय-या आणि मजबूत तटबंदी दाखवण्यात आली.पणत्यांना इ.१लीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या चिमुकल्या हातांनी रंगविली तसेच शुभेच्छा पत्रे बनविली.बनविलेली उटण्यांचे एकेक पाकीट प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आले.

रांगोळी रेखाटन करुन त्यात सुंदर रंग भरले.त्यानंतर बनविलेले आकाश कंदील वर्गात बांधण्यात आले.
अंगणात एका ओळीत,गोल वर्तुळाकार पणत्या ठेवण्यात आल्या.शेवटी मंद तेवणा-या पणतीच्या प्रकाशात विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा केळकर यांनी केले. तर हा उपक्रम संपन्न होण्यासाठी श्री. राजेश पवार (उपशिक्षक),ग्रामस्थ श्रीम. मानसी वैद्य,अंगणवाडी मदतनीस पायल घाणेकर, शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्रीम. रिया राणे,उपाध्यक्ष श्रीम. श्वेता सनगरे,सिमरन सनगरे यांनी मोलाचे सहकार्य केले.





