६ नोव्हेंबरला चिपळूणमध्ये विभागीय ‘डाक अदालत’; ३ नोव्हेंबरपर्यंत तक्रारी सादर करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. २ ): डाकघर अधीक्षक विभागीय कार्यालय चिपळूणच्यावतीने येत्या ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय स्तरावरील ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत अधीक्षक डाकघर कार्यालय चिपळूण, चिपळूण नगरपरिषदेसमोर येथे पार पडणार आहे.
पोस्टाच्या कामकाजाशी संबंधित ज्या तक्रारींचे अद्याप निराकरण झालेले नाही किंवा ज्या तक्रारींवर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा प्रकरणांची दखल या डाक अदालतीमध्ये थेट घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने टपाल वितरण, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, टपाल बचत बँक आणि मनीऑर्डर विषयक तक्रारींचा विचार केला जाणार आहे.
तक्रार अर्जासाठी महत्त्वाच्या अटी:

  • एका व्यक्तीने केवळ एकाच तक्रारीसाठी अर्ज करावा.
  • तक्रार अर्जात संपूर्ण वस्तुस्थिती व तपशील स्पष्टपणे नमूद केलेला असावा.
  • तक्रार अर्ज अधीक्षक डाकघर कार्यालय चिपळूण, चिपळूण नगरपरिषदेसमोर, चिपळूण या पत्त्यावर दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा तत्पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपालाने पोहोचेल अशा बेताने पाठवावा.
    मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा अदालतीत विचार केला जाणार नाही, असे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button