
मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक, ‘एक्यूआय’ 187 वर!
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रदूषण कायम असून आजही एक्यूआय 187 इतका नोंदवला गेला. हवेची ही गुणवत्ता आरोग्याला घातक श्रेणीत मोडत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत प्रचंड उकाडा असतानाही गेल्या काही दिवसांपासून ‘एक्यूआय’ 150 च्या वर नोंदवला जात आहे. समुद्राकडून येणारे वारे संथ झाल्याने हवेत धूळ टिकून राहत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
पालिका सतर्क
वाढत्या प्रदूषणामुळे पालिकेने रस्ते न झाडता सक्शन आणि पाण्याने रस्ते धुण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकामांसाठी 28 प्रकारची गाईडलाइनही जारी करण्यात आली असून नियम मोडल्यास दहा हजारांचा दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.




