
मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी पुलावर मासळीचा ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ब्रेक फेल झाल्याने मासळी वाहतूक करणारा ट्रक उलटला. या अपघातात चालक सुदीप दुबे (२५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या दापोली) किरकोळ जखमी झाला असून, मासळीचे मोठे नुकसान झाले.
दापोलीहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकचे (एमएच ०८ डब्ल्यू ४६८६) ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गावर पलटी झाला. जखमी चालकाला पाली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.




