
ग्राहक पंचायत आणि अन्न आणि औषधे प्रशासन विभागाचे पटवर्धन हायस्कूल येथे मार्गदर्शन
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. रत्नागिरी येथील ग्राहक पंचायत या ग्राहक हितासाठी सातत्याने काम करणाऱ्या संस्थेने अन्न आणि औषध प्रशासनासोबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटवर्धन हायस्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी अन्न आणि औषध प्रशासनाने जारी केलेल्या विविध नियमांची आणि कर्तव्यांची माहिती देण्यात आली. या वेळी श्रीमती घरत यांनी दूध, मध इत्यादी दैनंदीन जीवनात लागणाऱ्या वस्तूमधील भेसळ कशा प्रकारे ओळखता येईल याची उद्बोधक माहिती दिली. या वेळी 1800 222 365 या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना कोणतीही तक्रार नाव गुप्त ठेवण्याची हमी देऊन करता येणार आहे.
ग्राहक पंचायत तर्फे श्री कोत्रे, कार्यवाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ग्राहक पंचायत कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी ग्राहकांचे हक्क आणि सतर्कता या बद्दल माहिती सांगून ग्राहकांच्या मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायत सातत्याने कार्यरत असल्याबद्दल प्रतिपादन केले.
या वेळी भारत शिक्षण मंडळाचे श्री विनायक हातखंबकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष संजय वैशंपायन यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय खजिनदार अनंत भडकमकर, गोविंद गाडगीळ यांच्या सोबत सौ. वर्षा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आभार पर्यवेक्षिका वर्षा जोशी यांनी मानले आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या माहिती चा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल आणि सतर्क ग्राहक निर्माण होण्यासाठी मदत होईल असे सांगितले.




