भारत पेट्रोलियमच्या पंपाला दिलेली मुदतवाढ संपल्याने जागा परत घेण्यात यावी, इनायत मुकादम यांचे निवेदन


चिपळूण नगर परिषदेच्या मालकीची मार्कंडी येथील पवन तलावालगत असलेली कोट्यवधी रुपये किमतीची जागा भारत पेट्रोलियम कंपनीच्या (लक्ष्मी ट्रेडर्स, मेहता पेट्रोलपंप) ताब्यात आहे. या जागेसाठी करण्यात आलेल्या मूळ भाडेपट्टा कराराची मुदत संपली असून, राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जागेचा ताबा घेण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने कायदेशीर कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी इनायत इब्राहिम मुकादम यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार १९५४ मध्ये कं पनीसोबत २५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टा करार करण्यात आला होता. या कराराची मुदत १९७९ मध्ये संपल्यानंतर जागा मोकळी करून नगर परिषदेकडे ताबा देणे आवश्यक होते. मात्र, कराराचे नूतनीकरण किंवा मुदतवाढीचा नवीन करार न करता या जागेचा वापर सुरूच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button