
साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सणासुदीच्या काळात होणारी साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांना साखरेचा साठा मिळाल्यानंतर पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ तो स्वतःकडे ठेवता येणार नाहीतसेच, देशभरात कोणत्याही वेळी व्यापाऱ्यांना एक हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. हे सुधारित नियम १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहतील.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली. साखरेच्या पुरवठा साखळीमध्ये अनावश्यक साठा होऊ नये, साखर कारखान्यांपासून वितरकांमार्फत तिथून ग्राहकांपर्यंत तिचा नियमित पुरवठा व्हावा, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. पुरेशा साठ्यासाठी प्रयत्न ‘नव्या नियमांनुसार व्यापाऱ्यांना साखरेचा साठा मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत त्याची विक्री किंवा पुढील वितरण करावे लागेल.



