
जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून मतदार याद्यांचा शुद्धीकरण कार्यक्रम, जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची नावे वगळली
रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी निवडणुका अधिक पारदर्शक आणि अचूक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा एक मोठा व कडक धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी प्राप्त अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतून तब्बल १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची नावे विविध कारणांमुळे अयोग्य ठरविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण १३ लाख २९ हजार ०४२ नोंदणीकृत मतदारांमधून एवढी मोठी नावे वगळली जाणार असल्याने वर्षानुवर्षे रेंगाळलेला मृत व बोगस मतदारांचा तिढा सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, या कारवाईत रोजगारासाठी किंवा इतर कारणांमुळे जिल्ह्याबाहेर गेलेले ६२ हजार ९८३ नागरिक कायमचे स्थलांतरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ३४ हजार ६२६ मतदारांचे निधन झाले असून, १८ हजार ५० मतदार राहत्या पत्त्यावर अनुपस्थित किंवा शोध न लागलल आढ ळल आहेत. विशेष म्हणजे, १५ हजार ६७० मतदारांची नाव आधीच इतर विकाणी नोंदविलेली असतानाही इथे दुबार आढळली, तर २८१ अर्ज इतर तांत्रिक कारणामुळे अयोग्य ठरवण्यात आले आहेत विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारीचा आढावा घेतला तर रत्नागिरी मतदारसंघात सर्वाधिक ४३ हजार ५७१ मतदारांचे अर्ज अयोग्य आढळले आहेत.




