सलग १३ वर्षांच्या नेटबॉल विजेतेपदाची दखल; ज्ञानदीपच्या क्रीडा शिक्षकांचा सत्कार


राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन


रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ज्ञानदीप विद्या संकुल, भडगाव येथील खेळाडूंनी १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांमध्ये सलग १३ वर्षे विजेतेपद मिळविल्याबद्दल ज्ञानदीप विद्या संकुलचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि रत्नागिरी जिल्हा नेटबॉल संघटनेच्या सचिव समिधा झोरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्ञानदीप विद्या संकुलच्या तीन राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू कु. आर्ना रुपम पाटणे, कु. मुक्ता शीतल पेठे आणि कु. अनुष्का नरेश शिंदे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कु. आर्ना रुपम पाटणे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

ज्ञानदीप विद्या संकुलच्या खेळाडूंनी सलग १३ वर्षे विविध वयोगटांत विजेतेपद मिळवत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशामागील सातत्यपूर्ण सराव, खेळाडूंची मेहनत आणि क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन यांचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button