
सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार
मरेन पण मागं हटणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही’ आज 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार, मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही.यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जायचं माझ्यासोबत 2 अँबुलनस असतील 10 माणसांपेक्षा माझ्यासोबत कुणीही असणार नसल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथ रविवार ता. 14 उपोषणाच्या सतराव्या दिवशी पञकारांशी संवाद साधताना सांगितले.
या वेळी बोलतांना जरांगे यांनी सांगितले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या काळात परवानगी नाकारली ना मग फडणवीस मला एकट्याला परवानगी देणार की नाही.? आझाद मैदानांवर आता मला परवानगी देणार का? मि एकटा आधी खिंड लढवतो आधी एकटा मी मुंबईत जातो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणावाराच्या आड लपून मराठ्यांवर वार केला आहे.मराठ्यांनी मुंबईत येऊन धिंगाणा करावा आणि मराठ्यांना दंगलीचा डाग लागावा, असा त्यांचा डाव होता. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मी एकटा पुढे चाललो आहे. रस्त्यातील सगळे काटे मला काढू द्या म्हणजे तुम्हाला टोचणार नाहीत. आता मी एकटा जात असल्याने देवेंद्र फडणवीस कोणती परवानगी नाकारणार? आणि आता जर नाकारली, तर करोडो मराठे बेकायदा बिनापरवानगीचे मुंबईत शिरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सगळ्या बांधवांनी, महिलांनी आणि वृद्धांनी आपल्या गावात, तालुक्यात किंवा शहरात ग्रामपंचायतीसमोर शांततेत फेऱ्या व रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा चालू ठेवावा. महिलांनीही आपली ताकद वाढवत राहावी, मुंबईत कधी निघायचे याची तारीख दोन दिवस आधी सांगितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मला फक्त समाजाच्या लेकरांसाठी शरण जायचं नाही.सोमवारि सकाळी 2 गाड्या आणि 2 अँबुलनस घेऊन मि निघतो मला कोण अडवतो ते बघतो शक्यतो शेवटची भेट असेल. त्यामुळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, पण मुंबईला येऊ नका. शक्यतो ही माझी गोदा पट्ट्याशी आणि महाराष्ट्राशी शेवटची भेट असू शकते, अशी भावनिक साद मराठा आंदोलक मनोज मनोज जरांगे पाटील घातली. उद्या 15 सप्टेंबर ला, मी एकटाच मुंबईला निघणार आहे.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊ नका. पण तुम्ही ज्या गाड्या लावल्या आहेत, वर्गणी करून तुम्ही जे वाहनं लावलेले आहेत, ते सध्या जशाच्या तसंच ठेवा, त्या वर्गणीमधील पैसे देखील खर्च करू नका’ तुम्ही मुंबईत कधी यायचं हे लवकरच कळवतो मुक्कामाचे ठिकाण कायम राहील, मुक्कामाच्या ठरलेल्या ठिकाणी अंतरवालीच्या उपोषणासारखं ठिकाण तयार करा.मि तिथेच उपोषण करीन.प्रत्येक ठिकाणी अशीच व्यवस्था ठेवा मुंबईत येतांना वैद्यकीय उपचार घेणार नाही असे जरांगे यांनी सांगितले.




