१० सप्टेंबरपासून कोकण मार्गावर मेमू स्पेशल


गणेशोत्सवात कोकण मार्गावर अनारक्षित मेमू स्पेशलच्या ९२ फेर्‍या धावणार आहेत. यामध्ये पनवेल-चिपळूणसह दिवा-खेड, दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशलचा समावेश आहे. या मेमू स्पेशलची कोकण मार्गावर अधडधड सुरु होणार आहे.
०११५९/०११६० क्रमांकाची पनवेल-चिपळूण मेमू अनारक्षित स्पेशल १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत धावेल. पनवेल येथून दुपारी ३.३० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.२० वाजता चिपळूण येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ९.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. स्पेशलला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, निन्देरे दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, आंजणी स्थानकात थांबे आहेत.
०११५५/०११५६ क्रमांकाची दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशल ११ ते २७ सप्टेंबर यादरम्यान नियमितपणे धावेल. दिवा येथून सकाळी ७.१५ वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी २.३५ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात खेड येथून सायंकाळी ४ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.५० वाजता दिवा येथे पोहोचेल. १२ डब्यांच्या मेमू स्पेशलला निलजे, तळोजा, पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक स्थानकात थांबे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button