
आसमंत वनस्पती उद्यानात रविवारी ‘नेचर वॉक’
रत्नागिरी एमआयडीसी येथील आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या आसमंत वनस्पती उद्यानात येत्या रविवारी (ता. 10) सकाळी 8 वाजता नेचर वॉकचे आयोजन केले आहे. या वेळी ठाणे येथील अर्बन बायोडायव्हर्सिटीचे तज्ञ, निसर्गप्रेमी अभ्यासक या उद्यानात दिसणारे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे यांची माहिती देणार आहेत. या नेचर वॉकसाठी रत्नागिरीतील निसर्गप्रेमी, हौशी छायाचित्रकारांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी आसमंतचे अध्यक्ष तथा उद्योजक नंदकुमार पटवर्धन (मोबाईल नं. 9970056523) यांनी केले आहे. हे उद्यान सुमारे 8 एकरवर वसले असून सुमारे 200 प्रकारच्या देशी वनस्पतींची लागवड केली आहे. येथे नव्याने आता फुलपाखरू उद्यानही साकारत आहे. निसर्गप्रेमींना या उद्यानाची अभ्यासपूर्ण सैर करता यावी, याकरिता नेचर वॉकचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी आपल्या मुलांसोबत यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com