जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल


रत्नागिरी, दि. 7 )- ) ‘राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चुकीच्या अर्जदारांना प्रवेश दिल्याच्या तक्रार अर्जावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 15 दिवसात चौकशी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज झाला. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एम.एस. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, यांच्यासह विभाग प्रमख आदी उपस्थित होते.
सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री जिंदल म्हणाले, 7 दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा. संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील अनधिकृत पोल्ट्रीमुळे जिवितास धोका होत असल्याच्या अर्जावर गटविकास अधिकारी देवरुख यांनी तात्काळ वस्तुस्थिती पाहून प्रश्न निकालात काढावा.
आजच्या लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावाही घेतला. ज्या विभागांकडे अर्ज प्रलंबित असतील त्यांनी ते वेळेत मार्गी लावावेत. केवळ संबंधित विभागाकडे वर्ग करणे एवढेच काम करु नये. त्याबाबत पाठपुरावाही करावा, असेही ते म्हणाले.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button