
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारी तीन ड्रोनसह गस्ती नौकेची करडी नजर
रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात १२ सागरी मैलांच्या आतील क्षेत्रात होणार्या अवैध पर्ससीन जाळ्याच्या मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने करडी नजर ठेवली आहे. यासाठी तीन ड्रोन आणि गस्ती नौकेच्या माध्यमातून नियमित पाहाणी केली जात असल्याची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी दिली. त्याचबरोबर पारंपरिक मच्छिमारांच्या शाश्वत मच्छिमार हक्क संघाचे पदाधिकारीही अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहेत.




