
दोन महिन्यांनी आंबेनळी घाटातून धावली ‘लालपरी’, शिवसेनेच्या मागणीची दखल
उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर पदाधिकाऱयांनी केलेल्या मागणीची दखल सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाने घेत पोलादपूर मार्गावरील महत्त्वाचा आणि दळणवळणाचा मुख्य दुवा असलेल्या ऐतिहासिक आंबेनळी घाटातून अखेर एसटी बस वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग दोन महिने बंद असलेली एसटी सेवा पूर्ववत सुरू झाल्याने महाबळेश्वर, पोलादपूर आणि संपूर्ण घाट परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासूनच आंबेनळी घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच घाटात सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामांमुळे डोंगररांगांमधून मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होत होती. घाटातील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि प्रवाशांच्या जीवाचा धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सलग दोन महिने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद ठेवली होती.मागील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आणि परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली. तरीही या मार्गावरून एसटी महामंडळाची वाहतूक सुरू नव्हती. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.




