भोस्ते घाटात खेड–चिपळूण बसला अपघात; कंटेनरच्या धोकादायक ओव्हरटेकमुळे थरार

अवघड वळणावर कंटेनर चालकाचा प्रयत्न; सुदैवाने प्रवासी सुरक्षित



खेड : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात खेड–चिपळूण मार्गावरील प्रवासी बसला कंटेनरच्या धोकादायक ओव्हरटेकमुळे अपघात झाल्याची घटना घडली. घाटातील चढावावरील अवघड वळणावर कंटेनर चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड–चिपळूण मार्गावरील बस भोस्ते घाटातील चढ चढत होती. यावेळी अरुंद रस्ता आणि अवघड वळण असतानाही एका कंटेनर चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या धोकादायक प्रयत्नादरम्यान दोन्ही वाहनांचा अपघात झाला.

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेनंतर काही काळ भोस्ते घाट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अरुंद रस्ता, तीव्र चढ आणि धोकादायक वळणांमुळे भोस्ते घाटातून वाहन चालविताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असतानाही बेदरकारपणे ओव्हरटेक करण्याचे प्रकार होत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.

या घटनेमुळे घाटातील अवघड वळणांवर ओव्हरटेक करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी ओव्हरटेक टाळावे, असे आवाहन करण्यात येत आ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button