
आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोपा वरून पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना अटक
पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून मंत्र्याना प्रश्न विचारणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित हे कायदाच्या कचाट्यात सापडले आहेत युट्यूबवरून आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोपानंतर संतोष पंडित यांना कोथरुप पोलिसांनी अटक केली आहे.पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना राहत असलेल्या ठिकाणावरून अटक केली आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अगदी कालच संतोष पंडित यांनी कारच्या नंबर प्लेटवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जाब विचारला होता.
मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा संतोष पंडित यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात कोथरुड पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. सारिका कांबळे नावाच्या महिलेने त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता संतोष पंडित यांना अटक केली आहे.संतोष पंडित यांनी त्यांच्या युट्युब अंकाऊंटवरून मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याविरोधात एका आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप संतोष पंडित यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल करण्यात आली. संतोष पंडित यांचा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला आहे. त्यानंतर सारिका कांबळे यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी तक्रार दिल्यानंतर संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय सहिंतेच्या कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात महिती तंत्रज्ञान अधिनिम कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.




