सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेज उपहारगृहावर ‘एफडीए’ची धाड


सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहाची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीदरम्यान उपहारगृहातील अन्नपदार्थांच्या साठवणुकीसह स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.पीठ ठेवलेल्या बरणीजवळ झुरळे आढली, तर साखरेमध्ये मुंग्या असल्याचे निदर्शनास आले. तसेच, उपहारगृहात कार्यरत कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचेही समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत एफडीएने हे उपहारगृह पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

उपहारगृहाचा परवाना सुनील जाधव यांच्या नावावर असून, पराग नलावडे हे उपहारगृह चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली. पथकाने उपहारगृहाचे स्वयंपाकघर व विक्री कक्षाची पाहणी केली. यात उपहारगृहात कीटक नियंत्रणासाठी पेस्ट कंट्रोल केले नसल्याचे आढळून आले. अन्नपदार्थांच्या साठवणुकीच्या ठिकाणी झुरळे आणि मुंग्या आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी उपहारगृहातून विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.तपासणीदरम्यान उपहारगृह व्यवस्थापनाला आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, या कालावधीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत उपहारगृह बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button