मंडणगड तालुक्यातील पालेकोंड येथे शेतकर्‍याची २ लाख ७६ हजारांची ऑनलाईन फसवणूक


मंडणगड तालुक्यातील पालेकोंड येथील शेतकरी सुनिल धोंडू माळी (वय ४७) यांची अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सऍपवरून संपर्क साधून बँक ऑफ इंडियाची लिंक ओपन करण्यास सांगत २ लाख ७६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
सुनिल माळी यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. तसेच अशोक नटे, रा. पाले, ता. मंडणगड यांच्या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या संदेशातील बँक ऑफ इंडिया लिंक त्यांनी उघडली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख ७६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आले. या प्रकरणी सुनिल धोंडू माळी यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक किंवा बँक खात्याशी संबंधित लिंक उघडू नयेत. कोणतीही संशयास्पद लिंक किंवा संदेश आल्यास बँकेशी अथवा सायबर पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा अधिक तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button