हर्णे समुद्रात गुजराती बोटीची स्थानिक मासेमारी बोटीला धडक


हर्णे समुद्रात खोल समुद्रात मासेमारीदरम्यान गुजरातमधील एका मासेमारी बोटीने स्थानिक मासेमार महेश वाघे यांच्या बोटीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत वाघे यांच्या बोटीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हर्णे बंदरातील स्थानिक मासेमारांनी तत्काळ आपापल्या बोटी घेऊन समुद्रात धाव घेतली आणि महेश वाघे यांची नुकसानग्रस्त बोट सुरक्षितपणे किनार्‍यावर आणली. धडक देणार्‍या गुजरातमधील बोटीलाही हर्णे बंदरात आणण्यात आले. या घटनेनंतर समुद्रात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र; गुजरातमधील बोटमालकांनी आपली चूक मान्य करून नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविल्याने प्रकरण मिटल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button